Friday, November 6, 2015

श्री क्षेत्र आळंदी
--
ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. गणेश हरी खरे यांनी १९३१ साली लिहिलेले छोटेसे पुस्तक आपल्याला श्री क्षेत्र आळंदीची संपुर्ण एेतिहासिक माहिती देते. या पुस्तकात संत ज्ञानेश्वर यांचे समाधी मंदिर, आळंदी मधील इतर मंदिरे, मठ, धर्मशाळा, अनेक मित्या (दाने वगैरे), संत ज्ञानेश्वर समाधीचे नित्योपचार, आळंदीचे विविध एेतिहासिक उल्लेख व ज्ञानेश्वरांचे थोडक्यात चरित्र एवढी एेतिहासिक माहिती मिळते. या पुस्तकाच्या झेरॉक्स प्रत अभ्यासकांना उपलब्ध होउ शकेल.
मूल्य रु. ५०/- संपर्क : पराग पुरंदरे, अपरांत, फोन नं. ९४०३६ ०५७८३ किंवा इमेल :aprantbooks@gmail.com

 ‘मूर्तिविज्ञान’ व् ‘महाराष्ट्राची चार दैवते’
--
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी स्थापन केलेले भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे ने आपली १०७ वर्षांची वाटचाल पूर्ण केली. या कालावधीत मंडळाने अनेक् मान्यवरांची अनेक विषयांवरील पुस्तके, विविध शोधनिबंधत्रैमासिकांतून् इतिहास अभ्यासकांसाठी प्रकाशित केलेले आहेत.
ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. डॉ. ग. ह. खरे हे प्रदीर्घ कालावधीसाठी मंडळात कार्यरत होते. त्यांचा बहुविध अभ्यास सर्वांच्याच परिचयाचा आहे. नाणी, ताम्रपट्, शिलालेख तसेच फर्माने व काग दपत्रे इ.चे वाचन डॉ.खरे कित्येक वर्षे करीत होते. डॉ.खरे यांची जवळपास ५० पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत.
शताब्दी वर्षात मंडळाने त्यांची ‘शिवचरीत्रप्रदीप’ व ‘संशोधकाचा मित्र’ ही दोन पुस्तके पुन:मुद्रित केली होती. त्याचप्रकारे मंडळाने आता डॉ.ग.ह. खरे यांनी लिहिलेली ‘मूर्तिविज्ञान’ व् ‘महाराष्ट्राची चार दैवते’ ही दोन पुस्तके पुन:मुद्रित् केली आहेत.
मूर्तिविज्ञान व महाराष्ट्राची चार दैवते ही दोन्ही पुस्तके अभ्यासासाठी व संदर्भग्रंथ म्हणून आजही वापरण्यात येतात व ही पुस्तके आता दुर्मिळ आहेत.
ह्या दोन्ही पुस्तकांचे एकत्रीत मूल्य रु.८००/- आहे.
इच्छुकांनी मंडळामध्ये श्री.देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा.
भारत इतिहास संशोधक मंडळ
१३२१, सदाशिव पेठ, पुणे-३० फोन : ०२०-२४४७२५८१
वेळ सकाळी ८.३० ते ११.३० व दुपारी ४ .०० ते ८.०० (गुरुवारी साप्ताहिक सुट्टी)
किंवा
पराग अनंत पुरंदरे +९१ ९४०३६ ०५७८३ या नंबरवर संपर्क साधावा

Thursday, November 5, 2015

"माझी इतिहासातील मुशफिरी" हे अपरांतचे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक.--
डॉ.दत्तात्रय केतकर यांनी इतिहासाच्या ओढीतुन विद्यानाच्या अंगाने जाणारी इतिहास मांडणी या पुस्तकात केली आहे. 
या पुस्तकात त्यांनी विविध विषय वेगळ्या पध्दतीने मांडले आहेत तसेच अनेक विस्मरणात गेलेल्या गोष्टी व माणसे यांना लोकांसमोर आणले आहे. या पुस्तकात त्यांनी पोवाड्यांमधुन दिसणारे अरमारी लढायांचे वर्णन, भारतीय पोलाद आणि दमास्कस तलवारी, दिल्लीचा लोहस्तंभ, शिवकालीन दळणवळण आणि संदेशवहन, ओझ्याचे बैल आणि हत्ती, पेशव्यांचे सरखेल धुळप, आंग्रे घराण्यातील व्यक्तींच्या समाध्या व तुळशी व्रुंदावने असे एेतिहासिक विषय तर अर्देसर कुरसेटजी वाडीया, स्टीम जॉनस्टोन अशा जुन्या काळातील काही कर्तबगार लोकांची नव्याने ओळख करुन दिली आहे. या पुस्तकात वाचकांना छोट्या छोट्या अभ्यासपूर्ण लेखांमधुन अनेक ऐतिहासिक गोष्टींची नव्याने माहिती करुन दिली आहे.    
पुस्तकाचीे पाने : १३०. पुस्तकाचे मुल्य : रु. १६०/-, पुस्तक सर्व प्रमुख पुस्तक विक्रत्यांकडे उपलब्ध आहे.
अधिक माहिती साठी संपर्क साधा. ०९४०३६०५७८३ किंवा aprantbooks@gmail.com
पेशवेकालीन पुणे शहरातील कोतवाली
--

पेशवेकालीन पुणे शहरातील कोतवाली या डॉ. पुष्कर शास्त्री यांनी लिहिलेल्या पुस्तकात आपल्याला पेशवेकाळातील कोतवाल या मानाच्या अधिका-याची जवाबदारी व कामे काय होती याची माहिती मिळते. घाशीराम कोतवाला आधी व नंतर इतर कोण कोण कोतवाल या पदावर काम करत होते ?  पुण्यामधे कोतवाली म्हणजेच चावडी नक्की कुठे होती ? तसेच सवाई माधवराव यांच्या लग्नात चोख बंदोबस्त ठेवल्याबद्दल नाना फडणवीसांनी घशीराम कोतवालााला गौरवलेले होते. अशा या पेशवाइतील महत्वाच्या कोतवाल या पदावरील अधिका-यांच्या संपूर्ण माहिती साठी पेशवेकालीन पुणे शहरातील कोतवाली हे पुस्तक अवश्य वाचा. 
पुस्तकाचे मूल्य रु. १५०/- असुन पुस्तक सर्व प्रमुख पुस्तक विक्रत्यांकडे उपलब्ध आहे.
अधिक माहिती साठी संपर्क साधा. ०९४०३६०५७८३ किंवा aprantbooks@gmail.com
मराठ्यांच्या अमलाखालील गुजरात गुजरातचा काही भाग जसा आधी दाभाडे आणि नंतर गायकवाडांच्याकडे होता तसाच काही भाग पेशव्यांच्या अमलाखाली होता. या भागावर पेशव्यांची महसुल, न्याय आणि प्रशासनाची कार्यपध्दतीबद्दलची माहिती या पुस्तकात विस्ताराने येते. तसेच महसुल वाढवण्यासाठी प्रशासन शेतक-यांना अनेक सवलती देत होते. या शिवाय मुस्लिम रयतेसाठी सुध्दा अनेक विशेष सवलती दिल्या गेल्या होत्या. गुजराती तसेच मुसलमान रयत पेशव्यांच्या अमलाखाली समाधानी होती का ? पेशव्यांच्या या गुजरातवरील संपूर्ण प्रशासन व्यवस्थेच्या माहितीसाठी अवश्य वाचा डॉ. पुष्कर शास्त्री लिखित मराठ्यांच्या अमलाखालील गुजरात हे पुस्तक.पुस्तकाची किंमत रु. २५०/- असुन सर्व प्रमुख पुस्तक विक्रत्यांच्याकडे उपलब्ध आहे.
अधिक माहिती साठी ९४०३६ ०५७८३ या नंबरवर किंवा aprantbooks@gmail.com या इमेल वर संपर्क साधावा.
अपरांतचे नवीन पुस्तक
“प्राचीन भारत इतिहास व संस्क्रुती“
ज्येष्ठ इतिहास संशोधक व डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लिहीलेल्या “प्राचीन भारत इतिहास व संस्क्रुती“ या पुस्तकातुन वाचकांना पहिल्यांदाच मराठीतुन आपल्या गौरवशाली इतिहास व संस्क्रुतीची अद्ययावत माहिती मिळते. या पुस्तकांत डॉ. देगलूरकर यांनी पाषाणयुगापासून १३व्या शतकापर्यंतच्या काळावर विस्ताराने माहिती दिली आहे. प्राचीन इतिहास, इंडॉलॉजी या विषयाच्या अभ्यासकांना हे पुस्तक विशेष उपयुक्त ठरणार आहे. हे पुस्तक ४५६पानी असुन भरगच्च माहितीसोबतच अनेक छायाचित्रेही असल्याने पुस्तकाची उपयुक्तता वाढली आहे. 
या पुस्तकात मांडण्यात आलेले ठळक विषय :
भारताची भौगोलिक माहिती
इतिहासाच्या अभ्यासाची साधने
सिंधु – सरस्वती संस्क्रुती व त्याकाळातील मानवी जीवन, व्यापार, स्थापत्य, कला, लिपी व धर्म.
वैदिक संस्क्रुती, ब्राह्मण व उपनिषत्कालीन संस्क्रुती
जैन व बौध्द धर्मांचा इतिहास व तत्वे
महाभारत व रामायणकालीन जीवन 
१६ महाजनपदे व मगधसाम्राज्याचा उदय
भारतावरील विविध परकीय आक्रमणे 
प्राचीन भारतातील अनेक पराक्रमी राजे व विविध राजवटी, जसे-
मौर्य, शुंग, काण्व, सातवाहन, गुप्त, वाकाटक, वर्धन, चालुक्य, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, कलचुरी, पल्लव, चोल, पांड्य, पाल, सेन, प्रतीहार वगैरे
ब्रुहत्तर भारत, प्राचीन भारताचे जगाशी संबंध व भारतीय संस्क्रुतीचा विस्तार, यांत श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, चीन, तिबेट, ब्रम्हदेश, थायलंड, जावा, सुमात्रा, चंपा या देशांची माहिती येते.
शेवटच्या भागात सिंधु – सरस्वती संस्क्रुती पासून १३ व्या शतकापर्यंतच्या विविध राजवटींच्या काळातील मंदिरस्थापत्य, शिल्पकला, शैलींची माहिती येते. यातच मंदिर स्थापत्यतील नागर, द्राविड, भुमिज व वेसर या शैलींचीही माहिती आहे. तसेच शिल्पकलेतील गांधार, मथुरा या शैली शिवाय मौर्य, शुंग, गुप्त-वाकाटक, चालुक्य, पल्लव, राष्ट्रकुट, चोल या राजवटींच्या काळातील शिल्पकलेची वैशिष्ट्यांची माहिती विस्ताराने येते.
पुस्तकाची किंमत रु. ५००/- असुन सर्व प्रमुख पुस्तक विक्रत्यांच्याकडे उपलब्ध आहे.

अधिक माहिती साठी ९४०३६ ०५७८३ या नंबरवर किंवा aprantbooks@gmail.com या इमेल वर संपर्क साधावा.