Thursday, November 5, 2015

अपरांतचे नवीन पुस्तक
“प्राचीन भारत इतिहास व संस्क्रुती“
ज्येष्ठ इतिहास संशोधक व डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लिहीलेल्या “प्राचीन भारत इतिहास व संस्क्रुती“ या पुस्तकातुन वाचकांना पहिल्यांदाच मराठीतुन आपल्या गौरवशाली इतिहास व संस्क्रुतीची अद्ययावत माहिती मिळते. या पुस्तकांत डॉ. देगलूरकर यांनी पाषाणयुगापासून १३व्या शतकापर्यंतच्या काळावर विस्ताराने माहिती दिली आहे. प्राचीन इतिहास, इंडॉलॉजी या विषयाच्या अभ्यासकांना हे पुस्तक विशेष उपयुक्त ठरणार आहे. हे पुस्तक ४५६पानी असुन भरगच्च माहितीसोबतच अनेक छायाचित्रेही असल्याने पुस्तकाची उपयुक्तता वाढली आहे. 
या पुस्तकात मांडण्यात आलेले ठळक विषय :
भारताची भौगोलिक माहिती
इतिहासाच्या अभ्यासाची साधने
सिंधु – सरस्वती संस्क्रुती व त्याकाळातील मानवी जीवन, व्यापार, स्थापत्य, कला, लिपी व धर्म.
वैदिक संस्क्रुती, ब्राह्मण व उपनिषत्कालीन संस्क्रुती
जैन व बौध्द धर्मांचा इतिहास व तत्वे
महाभारत व रामायणकालीन जीवन 
१६ महाजनपदे व मगधसाम्राज्याचा उदय
भारतावरील विविध परकीय आक्रमणे 
प्राचीन भारतातील अनेक पराक्रमी राजे व विविध राजवटी, जसे-
मौर्य, शुंग, काण्व, सातवाहन, गुप्त, वाकाटक, वर्धन, चालुक्य, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, कलचुरी, पल्लव, चोल, पांड्य, पाल, सेन, प्रतीहार वगैरे
ब्रुहत्तर भारत, प्राचीन भारताचे जगाशी संबंध व भारतीय संस्क्रुतीचा विस्तार, यांत श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, चीन, तिबेट, ब्रम्हदेश, थायलंड, जावा, सुमात्रा, चंपा या देशांची माहिती येते.
शेवटच्या भागात सिंधु – सरस्वती संस्क्रुती पासून १३ व्या शतकापर्यंतच्या विविध राजवटींच्या काळातील मंदिरस्थापत्य, शिल्पकला, शैलींची माहिती येते. यातच मंदिर स्थापत्यतील नागर, द्राविड, भुमिज व वेसर या शैलींचीही माहिती आहे. तसेच शिल्पकलेतील गांधार, मथुरा या शैली शिवाय मौर्य, शुंग, गुप्त-वाकाटक, चालुक्य, पल्लव, राष्ट्रकुट, चोल या राजवटींच्या काळातील शिल्पकलेची वैशिष्ट्यांची माहिती विस्ताराने येते.
पुस्तकाची किंमत रु. ५००/- असुन सर्व प्रमुख पुस्तक विक्रत्यांच्याकडे उपलब्ध आहे.

अधिक माहिती साठी ९४०३६ ०५७८३ या नंबरवर किंवा aprantbooks@gmail.com या इमेल वर संपर्क साधावा.

No comments: