Thursday, November 5, 2015

"माझी इतिहासातील मुशफिरी" हे अपरांतचे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक.--
डॉ.दत्तात्रय केतकर यांनी इतिहासाच्या ओढीतुन विद्यानाच्या अंगाने जाणारी इतिहास मांडणी या पुस्तकात केली आहे. 
या पुस्तकात त्यांनी विविध विषय वेगळ्या पध्दतीने मांडले आहेत तसेच अनेक विस्मरणात गेलेल्या गोष्टी व माणसे यांना लोकांसमोर आणले आहे. या पुस्तकात त्यांनी पोवाड्यांमधुन दिसणारे अरमारी लढायांचे वर्णन, भारतीय पोलाद आणि दमास्कस तलवारी, दिल्लीचा लोहस्तंभ, शिवकालीन दळणवळण आणि संदेशवहन, ओझ्याचे बैल आणि हत्ती, पेशव्यांचे सरखेल धुळप, आंग्रे घराण्यातील व्यक्तींच्या समाध्या व तुळशी व्रुंदावने असे एेतिहासिक विषय तर अर्देसर कुरसेटजी वाडीया, स्टीम जॉनस्टोन अशा जुन्या काळातील काही कर्तबगार लोकांची नव्याने ओळख करुन दिली आहे. या पुस्तकात वाचकांना छोट्या छोट्या अभ्यासपूर्ण लेखांमधुन अनेक ऐतिहासिक गोष्टींची नव्याने माहिती करुन दिली आहे.    
पुस्तकाचीे पाने : १३०. पुस्तकाचे मुल्य : रु. १६०/-, पुस्तक सर्व प्रमुख पुस्तक विक्रत्यांकडे उपलब्ध आहे.
अधिक माहिती साठी संपर्क साधा. ०९४०३६०५७८३ किंवा aprantbooks@gmail.com

No comments: