Friday, November 6, 2015

 ‘मूर्तिविज्ञान’ व् ‘महाराष्ट्राची चार दैवते’
--
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी स्थापन केलेले भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे ने आपली १०७ वर्षांची वाटचाल पूर्ण केली. या कालावधीत मंडळाने अनेक् मान्यवरांची अनेक विषयांवरील पुस्तके, विविध शोधनिबंधत्रैमासिकांतून् इतिहास अभ्यासकांसाठी प्रकाशित केलेले आहेत.
ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. डॉ. ग. ह. खरे हे प्रदीर्घ कालावधीसाठी मंडळात कार्यरत होते. त्यांचा बहुविध अभ्यास सर्वांच्याच परिचयाचा आहे. नाणी, ताम्रपट्, शिलालेख तसेच फर्माने व काग दपत्रे इ.चे वाचन डॉ.खरे कित्येक वर्षे करीत होते. डॉ.खरे यांची जवळपास ५० पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत.
शताब्दी वर्षात मंडळाने त्यांची ‘शिवचरीत्रप्रदीप’ व ‘संशोधकाचा मित्र’ ही दोन पुस्तके पुन:मुद्रित केली होती. त्याचप्रकारे मंडळाने आता डॉ.ग.ह. खरे यांनी लिहिलेली ‘मूर्तिविज्ञान’ व् ‘महाराष्ट्राची चार दैवते’ ही दोन पुस्तके पुन:मुद्रित् केली आहेत.
मूर्तिविज्ञान व महाराष्ट्राची चार दैवते ही दोन्ही पुस्तके अभ्यासासाठी व संदर्भग्रंथ म्हणून आजही वापरण्यात येतात व ही पुस्तके आता दुर्मिळ आहेत.
ह्या दोन्ही पुस्तकांचे एकत्रीत मूल्य रु.८००/- आहे.
इच्छुकांनी मंडळामध्ये श्री.देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा.
भारत इतिहास संशोधक मंडळ
१३२१, सदाशिव पेठ, पुणे-३० फोन : ०२०-२४४७२५८१
वेळ सकाळी ८.३० ते ११.३० व दुपारी ४ .०० ते ८.०० (गुरुवारी साप्ताहिक सुट्टी)
किंवा
पराग अनंत पुरंदरे +९१ ९४०३६ ०५७८३ या नंबरवर संपर्क साधावा

No comments: